आपण पाहतो हल्ली अनेक महिला स्ट्रेट केस करत असतात. कारण सरळ केस कोणत्याही कपड्यांवर उठून दिसतात. व याने महिलांच्या सौंदर्यात वाढ होते. म्हणून महिला यासाठी कुणी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तर कुणी महागडी उत्पादने वापरून केस सरळ करण्याचा प्रयत्न करत असतात. पण यामुळे तुमच्या केसांच्या समस्या अधिक वाढतात. पण याऐवजी तुम्ही घरगुती पद्धतीनेही केस स्ट्रेट करू शकता.
यासाठी तुम्ही घरगुती व नैसर्गिक गोष्टींच्या वापरानेही केस सरळ करू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती व नैसर्गिक उपाय सांगणार आहोत याचा तुम्हाला तुमचे केस सरळ करण्यासाठी खूप फायदा होईल. मग जाणून घेऊ या उपायांबाबत.
केसांना गरम तेल लावा
एका वाटीत नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह तेल गरम करन घ्या. आता हे तेल तुमच्या टाळूवर हलक्या हातांनी १५ मिनिटे मसाज करा आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर हलक्या हातांनी ओल्या केसांना धुवा. याने तुमचे केस मोकळे होण्या मदत होईल.
मुलतानी माती
मुलतानी माती हा त्वचा आणि केसांसाठी उत्तम पॅक आहे. केस सरळ करण्यासाठी मुलतानी मातीमध्ये अंड्याचा पांढरा भाग मिसळा. आता त्यात एक चमचा तांदळाचे पीठ घालून घट्ट पेस्ट बनवा. हा पॅक केसांना वरपासून खालपर्यंत लावा. यानंतर केसांना मोठ्या खांद्यावरून कंघी करा आणि १ तास असेच राहू द्या आणि नंतर धुवा. धुतल्यानंतर त्यावर दूध फवारावे. १५ मिनिटांनी पुन्हा धुवा. ही प्रक्रिया दोन ते तीन वेळा केल्यानंतर तुम्हाला परिणाम दिसू लागेल.
लिंबाचा रस आणि नारळाचे दूध
लिंबाचा रस आणि नारळाचे दूध चांगले मिसळा आणि २ ते ३ तास फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर केसांना मास्कप्रमाणे लावा आणि २० ते २५ मिनिटे राहू द्या. नंतर शैम्पूने धुवा. या मास्कमुळे तुम्हाला चमकदार आणि सरळ केस मिळतील.
व्हिनेगर बेसन आणि मुलतानी माती
केस सरळ करण्यासाठी अर्धा कप व्हिनेगर, चार चमचे बेसन आणि चार चमचे मुलतानी माती चांगले मिसळा. ही पेस्ट केसांना लावा आणि १० ते १५ मिनिटे राहू द्या आणि शॅम्पूने केस धुवा.