श्रीरामपूर शहरातील धान्य व्यापारी मोहित संजय कोठारी यांच्या नेवासा रोडवरील वडाळा महादेव येथील गोदामामधून अज्ञात चोरट्यांनी सोयाबीनवर डल्ला मारला. कोठारी यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोठारी यांचे नेवासा रोडवर धान्य गोदाम असून या ठिकाणी रात्रीसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. काल सुरक्षारक्षक सुट्टीवर असल्याने रात्रीच्या वेळी चोरट्यांनी गोदामाच्या पाठीमागील बाजूची भिंत फोडली. तेथून आत प्रवेश करून साधारण वीस पोते सोयाबीन चोरून नेले.
कोठारी यांनी या घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन याठिकाणी कळविली. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी गोदामाच्या पाठीमागील बाजूने भिंतीला खड्डे करून चोरी करण्यात आल्याचेे निदर्शनास आले. कोठारी यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.