मुंबई : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. यावेळीही शास्त्री अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. शास्त्रींनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी यावेळी ऑस्ट्रेलियात भारतीय संघ कसा जिंकला हे देखील सांगितले आहे. टीम इंडियाने 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यात रवी शास्त्री यांच्या मोलाचा वाटा आहे.

ऑस्ट्रेलियातल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, “आम्ही आक्रमकपणे खेळायचो आणि त्यामुळे विरोधी पक्षांना कोणतीही संधी दिली नाही, फिटनेसची सर्वोच्च पातळी, परदेशात 20 विकेट्स घेऊ शकतील अशा वेगवान गोलंदाजांचा गट तयार करणे तसेच तुमच्या वृत्तीशी संबंधित विशेषत: जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळता.

रवी शास्त्री पुढे म्हणाले की, “जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा कोणी तुम्हाला धमकावत असेल तर त्याच भाषेत उत्तर द्यायचं, भले तुम्ही घरच्या मैदानात खेळत असाल किंवा परदेशी भूमीवर. ऑस्ट्रेलियन टीमच्या शिव्यांना प्रत्युत्तर द्या असं टीमला रवी शास्त्रींनी सांगितलं.

याबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, “मी खेळाडूंना सांगितले होते की, तुम्हाला एक शिवी दिली तर तुम्ही त्यांना तीन द्या, दोन आपल्या भाषेत आणि एक त्यांच्या भाषेत.’

शास्त्री हे एक वर्ष वगळता 2014 ते 2021 दरम्यान भारताच्या कोचिंग स्टाफचे प्रमुख होते. या एका वर्षात अनिल कुंबळेची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a comment

Your email address will not be published.