होय, चक्रीवादळे सुदधा जुळी असू शकतात. नुकतीच हिंदी महासागरात, विषुववृत्ताजवळ उत्तर आणि दक्षिण गोलार्धात एकाच वेळी आसनी आणि करीम अशी दोन चक्रीवादळे तयार होऊन ती विरुद्ध दिशांनी सरकली.

त्यामुळे या जुळ्या चक्रीवादळांची चर्चा सुरू आहे. विविध स्त्रोतांतून टिपलेल्या छायाचित्रांमध्ये ही वादळी जणू आरशातील प्रतिबिंबासारखी दिसतात.या आधी एप्रिल २०१९ मध्ये फनी आणि लोर्ना अशी जुळी चक्रीवादळे तयार झाली होती.

पूर्वेकडे सरकणारे ढगांचे क्षेत्र आणि विषुववृत्तीय क्षेत्रांत पश्चिमेकडून वाहणारे तीव्र वारे यांमुळे ही स्थिती उद्भवल्याचे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

उत्तर गोलार्धात चक्रीवादळामधील वारे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वाहतात; तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे ही घटना दिसते.

Leave a comment

Your email address will not be published.