देशातील सध्याच्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती या कार वापरणाऱ्यांना परवडणाऱ्या नाहीयेत. यामुळे अनेक लोकांचा कल सीएनजी आणि इलेक्ट्रॉनिक कारकडे वाढताना दिसत आहे. सीएनजीचे दरही थोडेफार वाढले आहेत पण ते लोकांना परवडणारे आहेत.

भारतीय बाजारात अनेक कार कंपन्यांनी आपल्या सीएनजी कार बाजारात आणल्या आहेत. पण यातील थोड्याच कार अशा आहेत की ज्या कमी बजेटमध्ये सर्वोत्तम मायलेज देतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप 5 सीएनजी कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्या जबरदस्त मायलेज देतात आणि किंमतही कमी आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो

मारुती सेलेरियो सीएनजी 35.6 किमी मायलेज देते. असा दावा मारुतीने केला आहे. त्याची किंमत 6.69 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. कारमध्ये 998 cc इंजिन आहे, जे 57hp पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

मारुती वॅगनआर

मारुती वॅगनआर सीएनजी ३२.५२ किमी मायलेज देते. असा दावा कंपनीने केला आहे. यात 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 58 एचपी पॉवर आणि 78 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारची किंमत 6.42 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते.

मारुती अल्टो

मारुती अल्टो सीएनजी ३१.५९ किमी मायलेज देते. याला 796 cc इंजिन मिळते, जे 35.3 kW पॉवर आणि 69 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. अल्टोची किंमत ३.३९ लाख रुपयांपासून सुरू होते. तथापि, सीएनजी किट उपलब्ध असलेल्या व्हेरियंटची किंमत ५.०३ लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो

Maruti Suzuki S-Presso CNG 31.2 किमी मायलेज देते. त्याची किंमत 5.38 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. याला 1.0-लिटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 59 PS पॉवर आणि 78 Nm टॉर्क जनरेट करू शकते.

ह्युंदाई सँट्रो

Hyundai Santro CNG 30.48 kms मायलेज देते. त्याची किंमत 6.10 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. याला 1.1-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 60 PS पॉवर आणि 85 Nm टॉर्क जनरेट करू शकते.

Leave a comment

Your email address will not be published.