उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समास्यांचा सामना करावा लागतो. त्यात विशेषतः म्हणजे गॅस आणि अॅसिडिटीची समस्या अनेक लोकांना त्रस्त करते. यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात.

पण यावर अनेकदा घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. यासाठी काही फळे खूप फायदेशीर ठरतात. कारण अनेकदा उष्ण पदार्थ्यांमुळे शरीरात अॅसिडिटीची समस्या वाढते. ही उष्णता कमी करण्यासाठी आम्ही आज काही फळे सांगणार आहोत.

याने तुमची शरीरातील उष्णता कमी होऊन गॅस आणि अॅसिडिटीची समस्या दूर होईल. चला तर मग जाणून घेऊ या फळांबाबत जे तुमची गॅस आणि अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी मदत करतील.

केळी

केळी हे एक संपूर्ण अन्न आहे ज्यामध्ये कॅल्शियम फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. जर तुमच्या पोटात गॅस किंवा आम्लपित्त होत असेल तर तुम्ही केळीचे सेवन करू शकता. केळीमुळे दोन्ही गॅस अॅसिडिटीमध्ये आराम मिळतो. केळीमध्ये असलेले फायबर गॅस नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

टरबूज

टरबूज उन्हाळ्यात खूप फायदे देते. टरबूज खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. अन्नाचे पचन नीट झाले की गॅसचा त्रास होत नाही, यामुळे गॅस किंवा अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळते.

किवी

किवी हा व्हिटॅमिन सीचा खूप चांगला पर्याय आहे. त्यात आहारातील फायबर, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स चांगल्या प्रमाणात असतात. किवीचे सेवन केल्याने तुम्हाला गॅस किंवा अॅसिडिटीच्या समस्येत मदत होते.

काकडी

उन्हाळ्यात काकडी खूप फायदेशीर असते. काकडी शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. हे केवळ तुम्हाला थंडावा देत नाही. त्याचबरोबर पोटाची जळजळ देखील शांत होते.जेव्हाही गॅस किंवा अॅसिडिटी होत असेल तेव्हा तुम्ही काकडीचे सेवन करू शकता. यामुळे तुमची समस्या दूर होईल.

Leave a comment

Your email address will not be published.