उन्हाळ्यात घराच्या बाहेर पडायचे म्हंटले की आता लोकांच्या चिंता वाढू लागल्या आहेत. कारण उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढू लागला आहे.अशावेळी उन्हामुळे अशक्तपणा, चक्कर, व उलट्या यासारखे वेगवेगळे आजार वाढतात. म्हणजेच उष्माघाताचा त्रास होतो.

या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आपल्याला विशिष्ठ आहाराची गरज असते. यासाठी आज आम्ही तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहोत. ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मदत होईल.

सातू: सातू खाणे किंवा पिणे यामुळे मुलांमध्ये उष्माघाताचा धोका कमी होतो.त्यामुळे मुलांच्या आहारात बार्ली किंवा हरभऱ्यापासून बनवलेल्या सातूचा समावेश करू शकता. तसेच शरीर थंड ठेवण्यास मदत होते.

टरबूज: मुलांना हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही त्यांच्या आहारात टरबूजचाही समावेश करू शकता. टरबूजमध्ये ९२ टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू देत नाही आणि ताजेपणा टिकून राहतो.

दही : मुलांच्या आहारातही दही समाविष्ट करता येते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे पोटही तंदुरुस्त राहते आणि टेस्टमध्येही उत्तम. लहान मुलांना दह्याची गोड लस्सी आवडते.

पुदिना : उष्णतेपासून वाचण्यासाठी मुलांच्या आहारात पुदिना कोणत्याही स्वरूपात समाविष्ट करणे चांगले. यासाठी तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा सरबत बनवून मुलांना देऊ शकता.

लिंबूपाणी : उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही मुलांना लिंबूपाणीही देऊ शकता. हे ऊर्जा देण्याचे काम करते तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.

Leave a comment

Your email address will not be published.