भारतात बजेट सेगमेंटमधील कार म्हणजेच मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या स्वस्तातील कार घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही अशाच किफायतशीर कारबद्दल माहिती देणार आहोत.

मारुती सुझुकी आल्टो – सर्वसामान्यांना परवडणारी कार म्हणून आल्टो कार प्रसिद्ध आहे. वॅगनआर नंतर सर्वाधिक मागणी आल्टोलाच आहे. ही गाडी सीएनजी आणि पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या गाडीची एक्स शोरुम किंमत 3.15 लाख आहे.

मारुती सुझुकी वॅगनर- मारुती सुझूकीची वॅगन आर 1 लीटर आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन ऑप्शनमध्ये येते. भारतातील टॉप विक्री होणारी वॅगन आर लोकांची पसंतीची कार आहे.

एस प्रेसो – मारूतीची ही कार मायक्रो एसयूव्ही आहे. तिची किंमत 3.85 लाख रुपयांपासून सुरु होते. डॅट्सन गो – डॅट्सन गो या कारची किंमत 4.02 लाख (एक्स-शोरूम) असून भारतातील सर्वात स्वस्त कारच्या यादीत तिचं नाव येतं.

मारुती सुझुकी इको – मारुती सुझुकी ही 7 सीटर एमपीव्ही आहे. कंपनीने त्याचे सुमारे १ लाख युनिट्स विकले आहेत. इकोची सुरुवातीची किंमत 4.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

रेनो क्विड – या कारची किंमत 4.49 लाख रुपयांपासून सुरु होते. हि कार 0.8 लीटर 3 सिलिंडर पेट्रोल आणि 1 लीटर 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

सेलेरियो – ही लोकप्रिय कार असून ती तिच्या मायलेजसाठी देखील ओळखली जाते. तिची किंमत 5.10 लाखांपासून सुरु होते.

Leave a comment

Your email address will not be published.