अलीकडच्या काळात अनेक लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणत वाढू लागली आहे. ही समस्या रक्तातील चढ-उतारामुळे होत असते. यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा हृदय विकाराचा घोका वाढू लागतो. त्यामुळे अनेकजण रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. यावर उपाय म्हणून अशी काही फळे आहेत जी तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात.

यासाठी आज आम्ही तुम्हाला काही ४ फळांबाबत सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ या फळांबाबत जी तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतील.

१. किवी हृदयासाठी आरोग्यदायी आहे

किवी पचनक्रियेपासून प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. किवी खाल्ल्याने तुम्ही हायपरटेन्शनच्या समस्येवर नियंत्रण ठेवू शकता.विशेष म्हणजे किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवतात. दररोज दोन ते तीन किवीचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब, पक्षाघात, हृदयविकाराचा झटका यासारख्या समस्या टाळता येतात.

२. टरबूज उच्च रक्तदाब प्रतिबंधित करते

टरबूजमध्ये भरपूर पाणी असते, जे आपल्याला आतून ताजे, थंड आणि हायड्रेट ठेवते. या फळामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. टरबूजमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित करते.

३. उच्च रक्तदाबाची समस्या आंब्याने दूर होईल

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी आंब्याचे सेवन जरूर करावे. आंब्यामध्ये पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एक आदर्श फळ आहे. मँगो शेक, स्मूदी, फ्रूट चार्ट किंवा कट करूनही आंबा खाऊ शकता.

४. केळ्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो

पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केळी हे असेच एक फळ आहे, ज्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. या दृष्टीने केळी खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या टाळता येते.

Leave a comment

Your email address will not be published.