मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या ‘फोन भूत’ अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा यांच्या अफेअरच्या बातम्या खूप चर्चेत आहेत. नव्या आणि सिद्धांत एकमेकांना डेट करत असल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. या वृत्तांवर आता खुद्द अभिनेत्याने मौन तोडले होते. सिद्धांत चतुर्वेदीने नव्यासोबत डेटिंग अफवांना फक्त अफवा म्हंटल्या होत्या. दरम्यान, पुन्हा एकदा या दोघांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

नुकतीच नव्या सिद्धांतला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती. सिद्धांतच्या घराबाहेर पापाराझींनी नव्याला कॅमेऱ्यात कैद केले, ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नव्या कॅमेरा टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नव्या सिद्धांतला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती की नाही हे अद्याप निश्चित झाले नसले तरी अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी पुन्हा एकदा दोघांमध्ये काही तरी सुरु असल्याचे म्हंटले आहे.

‘फोन भूत’ अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने नव्यासोबतच्या डेटिंगच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या आणि म्हणाला होता, “मी कुणाला डेट करत आहे का? अशा परिस्थितीत, सिद्धांतच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते की तो सध्या सिंगल आहे आणि कोणालातरी डेट करू इच्छित आहे. एंटरटेनमेंट न्यूजच्या बातमीनुसार, सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नंदा करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र आले होते. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा अधिकच रंगल्या आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सिद्धांत चतुर्वेदीचा ‘फोन भूत’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पण हा हॉरर कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकलेला नाही. तर नव्या सध्या तिच्या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे.