अहमदनगर शहरात दुचाकीवर आलेल्या तरूणाने युवतीचा हात धरून तिचा विनयभंग केला असल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधित तरूणाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान शोएब शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पंचपीर चावडी, माळीवाडा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. या घटनेने संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच यामुळे नगर शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी, पीडित युवती शेख याला ओळखते. 1 एप्रिल, 2022 रोजी सायंकाळी फिर्यादी युवती चौपटी कारंजा येथून पायी जात असताना शोएब शेख तेथे आला व युवतीला म्हणाला,‘चल गाडीवर बस’, तेव्हा युवतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

युवती पुढे जाऊन रिक्षात बसली, तेव्हा शोएबने युवतीचा हात धरून गैरवर्तन करत विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *