मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून बराच चर्चेत राहिला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर तर धुमाकूळच घातला आहे. अनेक चित्रपटांचे विक्रम तोडल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट न पाहिलेल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवून, चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो OTT वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट लवकरच Zee5 वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये पाहता येणार आहे. G5 ने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती लोकांसोबत शेअर केली आहे.

मात्र, OTT वर हा चित्रपट कोणत्या तारखेपासून पाहता येईल, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा चित्रपट 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ 3.5 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published.