मुंबई : बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मोनिका ओ माय डार्लिंग’मुळे चर्चेत आहे. सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेल्या या चित्रपटात हुमा कुरेशी आणि राधिका आपटे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी राजकुमार त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या बहाण्याने तो त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलही चाहत्यांना अपडेट करत आहे. दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘स्त्री 2’ बद्दल एक मोठा खुलासा केला आणि हा चित्रपट प्रेक्षकांसमोर कधी येणार हे सांगितले.

2018 साली ‘स्त्री’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. चित्रपटाच्या यशानंतर चित्रपट निर्माते त्याचा सिक्वेल ‘स्त्री 2’ बनवण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटाबाबत बरेच दिवस कोणतेही नवीन अपडेट समोर आले नसले तरी आता या चित्रपटाबद्दल राजकुमार राव काय म्हणाला हे जाणून चाहत्यांना आनंद होईल.

पिंकविलाशी बोलताना राजकुमार राव त्याच्या आगामी हॉरर चित्रपट ‘स्त्री 2’ बद्दल बोलला आहे. हा निर्णय चित्रपट निर्मात्यांना घ्यावा लागेल, असे मला वाटते, अशा एका प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, “आशा आहे की ‘स्त्री 2’ लवकरच यईल आणि हो नक्कीच हे भयपट विश्व निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच चित्रपट रोमांचने भरलेला असेल, ‘स्त्री २’चे शूटिंग लवकरच सुरू करणार का, असे विचारले असता? राजकुमाराने फक्त असे सांगितले की आशा आहे की ते लवकरच होईल.

अलीकडच्या काळात श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ठुमकेश्वरी या डान्स ट्रॅकचा एक बीटीएस व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये तिने सांगितले की ती लवकरच स्त्री 2 चे शूटिंग सुरू करणार आहे.