छत्रपती चौथे शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेने नूतनीकरण केलेल्या छत्रपतींच्या स्मारकाचे लोकार्पण खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते उद्या म्हणजेच ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील काही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या मान्यवरांना स्वराज्याचे पहिले चलन शिवराई देऊन गौरविण्यात येणार आहे. सोबतच शिल्पकार विकास प्रकाश कांबळे यांचे शिल्प प्रात्यक्षिक होणार आहे, कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे शेतकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान गेल्या १३ वर्षांपासून स्मायलिंग अस्मिताच्या माध्यमातून छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आतापर्यंत संरक्षक भिंत आणि वाचनालय हॉलची दुरूस्ती झाली होती आणि आता तेथेच विशिष्ट ठेवणीचे सुशोभीकरण नुकतेच आमदार निधीतून करण्यात आले आहे.