मुंबई : पंजाब किंग्जच्या लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएलच्या या मोसमातील सर्वात लांब षटकार ठोकला आहे. लिव्हिंगस्टोनने 117 मीटर लांब षटकार मारला. या षटकारानंतर लिव्हिंगस्टोन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार ठोकणाऱ्या टॉप 10 फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम एल्बी मॉर्कलच्या नावावर आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना एल्बी मॉर्कलने पहिल्या सत्रात 125 मीटर लांब षटकार मारला होता. त्याचा विक्रम आजही कायम आहे.
या यादीतील दुसरे नाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माचा समावेश आयपीएलच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये झाला आहे. दोघांनी मोठे फटकेही मारले. विशेषतः रोहित लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
पण जेव्हा आयपीएलमध्ये लांबलचक षटकार मारण्याचा विचार येतो तेव्हा रोहित किंवा विराटचे नाव टॉप-10 मध्येही येत नाही. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम गोलंदाज प्रवीण कुमारच्या नावावर आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.
त्याने 124 मीटर लांब षटकार मारला आहे. लिव्हिंगस्टोनच्या षटकारानंतर प्रवीण कुमार पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार ठोकणाऱ्या टॉप 10 फलंदाजांमध्ये 4 भारतीयांचा समावेश आहे.
IPL इतिहासातील सर्वात लांब षटकार :