Jeep Meridian : जीप इंडियाने मंगळवारी तिच्या आगामी एसयूव्ही मेरिडियनसाठी बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली. सध्या भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनरसमोर ही सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे.

महाराष्ट्रातील रांजणगाव येथील कंपनीच्या प्लांटमध्ये त्याचे उत्पादन सुरू झाले आहे. जीप इंडिया ही ऑटोमोटिव्ह समूह स्टलांटिसचा एक भाग आहे.

कंपनीने सांगितले की, ग्राहक जीप इंडिया डीलरशिप नेटवर्कवर किंवा कंपनीच्या वेबसाइटवर 50,000 रुपयांच्या डाउन पेमेंटसह मेरिडियन बुक करू शकतात.

वाहनाची डिलिव्हरी जूनमध्ये सुरू होईल. जीप इंडियाने सांगितले की त्यांनी टाटा मोटर्ससोबत स्थापन केलेल्या संयुक्त उपक्रमाच्या उत्पादन सुविधेत मेरिडियनचे उत्पादन सुरू केले आहे.

मे रिडियनमध्ये प्रवाश्याना बसण्यासाठी एकूण सात जागा आहेत आणि SUV मध्ये 2-लिटर टर्बो डिझेल इंजिन आहे. सहा-स्पीड मॅन्युअल आणि नऊ-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ट्रान्समिशन पर्याय आहेत.

स्टेलेंटिस इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक रोलँड बोचारा म्हणाले की, मेरिडियन हे 2021 नंतर जीपने भारतात उत्पादित केलेले तिसरे नवीन मॉडेल आहे. ग्राहकांच्या गरजा आणि भारतीय रस्त्यांची स्थिती लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a comment

Your email address will not be published.