आपल्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद रोज कोणता ना कोणता वेगळा लूक करून मिडियासमोर येते.

तिच्या या अतरंगी लूकसोबतचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात. दरम्यान उर्फी तिच्या या स्टाईलसोबत पुन्हा एकदा स्पॉट झाली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.

उर्फीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओत उर्फीने स्वत:च्याच फोटोंचा ड्रेस परिधान केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिला ही कल्पना इंटरनेटवरून आल्याचे तिने सांगितले आहे. तिच्या या व्हीडिओला ७ तासात १ लाखा पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय.

उर्फी जावेदचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, “काय फोटो फ्रेम बनत फिरते.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ही काय पागल आहे का?” आणखी एका नेटकऱ्याने उर्फीला ट्रोल करत लिहिले की, “या मुलीला पैशाची गरज आहे तुम्ही हिली मदत करा.” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्फीला ट्रोल केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *