आपल्या व्यस्त जीवनात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्याही सुरू होतात. उन्हाळ्यात घाम, धूळ, माती आणि प्रदूषणाचा परिणाम आरोग्यासोबतच आपल्या त्वचेवर होतो.  

दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. स्किन केअर रूटीनमध्ये क्लीनिंग, टोनिंग, सीरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यांचा समावेश होतो. याशिवाय, काही लीव्ह-ऑन फेस मास्क देखील आहेत.

या फेस तुम्ही रात्रभर लावू शकता आणि सकाळी धुवू शकता. सकाळी चमकणारी त्वचा पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

जाणून घेऊया या फेस पॅकबद्दल 

दही आणि मध

एक चमचा दह्यात एक चमचा मध मिसळून चेहऱ्याला लावा. रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी स्वच्छ धुवा. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे मृत पेशींपासून मुक्त होते आणि मुरुमांना दूर ठेवते. मध त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि चमक देते.

काकडी आणि बदाम तेल

दोन चमचे काकडीच्या रसात एक चमचा बदामाचे तेल मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर रात्रभर राहू द्या. सकाळी उठल्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. काकडी सनबर्न किंवा जळजळीपासून त्वचेला आराम देते आणि त्वचेची पीएच पातळी राखते. दुसरीकडे, बदाम तेल त्वचेला हायड्रेट आणि मऊ करते.

बदाम आणि दूध

बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सोलून मिक्सरमध्ये बारीक करा. आता त्यात थोडे दूध घालून पेस्ट बनवा. आता कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी सामान्य पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेस मास्क तुम्ही आठवड्यातून तीनदा लावू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *