महाअपडेट टीम, 24 जानेवारी 2022 : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये एक कार डोंगराळ रस्त्यावर घाट दिसत आहे आणि एका कारचा ड्रायव्हर अतिशय खतरनाक पद्धतीने यू-टर्न घेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही कार ज्या रस्त्याने यू-टर्न घेते त्या रस्त्याची रुंदी कारच्या लांबीपेक्षा कमी आहे. असे असतानाही गाडीचा चालक चमत्कारिकरित्या तिला दुसरीकडे वळवतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ कुठचा आहे आणि चालक कोण आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, निळ्या रंगाची कार अतिशय अरुंद डोंगरी रस्त्यावरील घाटात दिसत असून ती तिथे यू-टर्न घेत आहे. गाडीच्या एका बाजूला खोल दरी दिसते तर दुसऱ्या बाजूला खडक आहे.

या ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण जणू आपल्या मनाच्या इशाऱ्यावर चालत असल्याचं दिसून येत आहे.ड्रायव्हर खूप लहान कट घेतो आणि स्टीयरिंग व्हीलसह एक्सीलरेटर, क्लच आणि ब्रेक्सवर नियंत्रण ठेवतो. आधी तो गाडी काही इंच मागे घेतो, मग पुढे घेऊन वळतो.अचानक तो पूर्ण वळण घेतो आणि गाडी U-टर्न घेते…

व्हिडिओ शेअर करताना एका ट्विटर युजरने लिहिले की हे 80 पॉइंट टर्नचे उत्तम उदाहरण आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही लोक म्हणाले की, हे खूप जोखमीचं काम आहे. मात्र, हा व्हिडिओ एडिट करण्यात आला असावा, अशी भीतीही काहींनी व्यक्त केली आहे. पहा हा व्हिडिओ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *