राज्यातील विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच्या तुलनेत पुरवठा मात्र कमी झाला आहे. यामुळे जिल्ह्यालाही अघोषित भारनियमनाचा फटका बसला आहे. दोन ते चार तासांचे भारनियमन दररोज होत असल्याने त्रास वाढत आहे. राज्यात अघोषित भारनियमन सुरू झाले आह़े त्यामुळे उन्हाच्या चटक्याबरोबरच नागरिकांना वीज भारनियमनाच्या झळाही बसू लागल्या आहेत़.

राज्यात मार्च २०२२ मध्ये वीजमागणी २८ हजार मेगावॉट होती. सध्या वीजमागणी २६ हजार ५०० मेगावॉटपर्यंत खाली येऊनही मागणी आणि पुरवठय़ात अडीच ते तीन हजार मेगावॉटची तूट आहे. ती दूर करण्यासाठी ५८ टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असलेल्या जी-१ ते जी-३ फिडरवरून वीजकपात केली जात आहे. याची झळ राज्यातील बहुतांश भागांना बसत आहे.

वीजेअभावी ग्रामीण भागांत पिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ आह़े शिवाय, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आह़े तसेच पुढे रमजान ईदही आहे. या सर्वाना भारनियमनाचा फटका बसण्याचे संकेत आहेत़.

महावितरणने विजेची खरेदी केली, तर ही अडचण दूर होण्यास मोलाची मदत मिळणार आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यातच कोळसा संपल्याचे कारण देत वीज निर्मितीवर परिणा झाल्याचा कांगावा होत आहे. दरम्यान गावखेड्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग होत आहे. रात्री-अपरात्री कधीही वीज गूल होते. त्यामुळे रात्रीच्या उकाड्यापासून ग्रामीण भागातील नागरिक चांगलेच हैराण बनले आहेत.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडून दररोज ६७३ मेगावॉट वीज मिळत असून, लवकरच इतरही कंपन्यांकडून वीजखरेदी केली जाईल. सध्या मागणी व पुरवठय़ात अडीच ते तीन हजार मेगावॉटचा तुटवडा आहे. त्यामुळे तात्पुरती वीजकपात केली जात असून, वीज उपलब्ध होताच वीजकपात बंद होईल.अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a comment

Your email address will not be published.