उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. व शरीराला थकवा जाणवतो. हा थकवा भरून काढण्यासाठी शरीरात फळं खाणे खूप महत्वाचे असते. म्हणून अशावेळी विशेषतः उन्हाळ्यात संत्री खाणे खूप फायद्याचे ठरते. याने शरीरात आलेला थकवा दूर होण्यास मदत होते. व शरीरात प्रतिकारशक्ती वाढते.

तर उन्हाळ्यात संत्री खाल्ल्याने आपल्या शरीराला योग्य थंडावा मिळतो. यासोबतच संत्री खाण्याचे असे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. चला तर मग जाणून घेऊ संत्री खाण्याचे आपल्या आरोग्याला होणारे फायदे.

१. रोगप्रतिकारशक्ती वाढवून, संत्री वजन कमी करते

संत्री हे नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहे, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. हे रक्त शुद्ध करण्यासोबतच स्टॅमिना वाढवण्यासही उपयुक्त आहे. विशेष म्हणजे संत्र्यामध्ये उच्च फायबर आणि व्हिटॅमिन सी आढळते. हे खाल्ल्याने भूक लवकर लागत नाही, त्यामुळे वजन वाढत नाही.

२. संत्र्यामुळे हाडे मजबूत होतात

संत्री हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे स्त्रोत देखील आहे, ज्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. हे हृदय गती आणि रक्तदाब नियंत्रित करते आणि हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करते.

३. संत्री त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे

संत्रीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी कोलेजन उत्पादनात मदत करते, जे त्वचेची ताकद सुधारून आणि जखमा भरून त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. म्हणूनच हिवाळ्यात संत्री खाण्याचा सल्ला दिला जातो.

४. संत्री शरीरातील हानिकारक घटक काढून टाकते

संत्रीमध्ये विविध पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कॅलरीज खूप कमी आहेत. संत्रीमध्ये कोणत्याही प्रकारची सॅच्युरेटेड फॅट किंवा कोलेस्ट्रॉल नसते. यासोबतच ते खाल्ल्याने तुम्हाला डायटरी फायबर मिळतं, जे हे हानिकारक घटक शरीरातून बाहेर काढण्यास मदत करते.

५. डोळ्यांच्या आरोग्यासाठी संत्री फायदेशीर आहे

डोळ्यांच्या आरोग्यासाठीही संत्री खूप फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास मदत करते. तसेच मॅक्युलर डिजनरेशन कमी करते. यामुळे तुमचे डोळे दीर्घकाळ निरोगी राहतात.

Leave a comment

Your email address will not be published.