महाअपडेट टीम, 24 जानेवारी 2022 : भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामनाही हरला होता, पण टीम इंडियाच्या या पराभवामुळे वेगवान गोलंदाज दीपक चहर अधिक चर्चेत आला आहे. चहरला या मालिकेत तिसरा एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली.
त्याने चमकदार कामगिरीही केली, त्याने 34 चेंडूमध्ये 54 धावांची खेळी करून टीम इंडियाला सावरले परंतु अवघ्या 4 रन्सने टीम इंडियाचा पराभव झाला. इंडियाच्या पराभवानंतर दीपक चहर खूपच भावूक झाला, त्याचे डोळे पाणावले.सध्या हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सामना संपल्यानंतर दीपक चहरच्या डोळ्यात आलं पाणी…
यजमान संघ दक्षिण आफ्रिकेनेही एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी करत टीम इंडियाचा 3-0 असा पराभव केला. शेवटच्या सामन्याच्या शेवटच्या षटकात खूप थरार होता, पण या थरारात यजमान संघाने बाजी मारली. या सर्वांमध्ये दीपकने फलंदाजीही चांगली केली, तरीही तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि महत्त्वाच्या वेळी त्याची विकेट गमावली.
https://twitter.com/BenaamBaadshah4/status/1485432299118534658?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1485432299118534658%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fdeepak-chahar-in-tears-after-his-fighting-34-ball-54-against-south-africa-goes-in-vain-622055.html
दीपक चहरने 54 धावांची शानदार खेळी खेळली.
पण चुकीचा फटका खेळून दीपकने त्याची विकेट गमावली.
आऊट झाल्यानंतर तो सीमारेषेच्या मागे बसून राहिला.
त्याचवेळी टीम इंडियाच्या पराभवानंतर दीपक चहर अचानक रडू लागला.