मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) चा 61 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) शानदार विजय नोंदवला आणि प्लेऑफमधील आपल्या आशा जिवंत ठेवल्या.

या सामन्यात केकेआरने विजय मिळाला असला, तरी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संघाचा एक भक्कम फलंदाज फ्लॉप ठरला. हा खेळाडूही काही काळापासून टीम इंडियाचा भाग आहे.

कोलकाता (KKR) ने IPL 2022 सुरू होण्यापूर्वी स्फोटक फलंदाज व्यंकटेश अय्यरला कायम ठेवले. पण या सीझनमध्ये व्यंकटेश पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. व्यंकटेश काही काळापासून टीम इंडियाचा भाग आहे, परंतु त्याचा खराब फॉर्म त्याला आगामी काळात संघातून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात व्यंकटेश अय्यरला 6 चेंडूत केवळ 7 धावा करता आल्या.

व्यंकटेश अय्यरला KKR ने 8 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. गेल्या मोसमात अय्यरने केकेआरला स्वबळावर अंतिम फेरीत नेले होते, पण आयपीएल २०२२ मध्ये तो संघाला चांगली सुरुवातही देऊ शकला नाही.

व्यंकटेश अय्यरने या मोसमात खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 18.20 च्या सरासरीने केवळ 182 धावा केल्या आहेत. या मोसमात त्याच्या बॅटने फक्त 1 अर्धशतक झळकावले आहे. त्याचबरोबर त्याला या मोसमात गोलंदाजीत एकही विकेट मिळालेली नाही.

व्यंकटेश अय्यरला प्रथमच आयपीएलच्या 14 व्या मोसमात खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर अय्यरने जबरदस्त खेळ दाखवला. अय्यरने गेल्या आयपीएल हंगामात 10 सामने खेळले, 41.11 च्या सरासरीने 370 धावा केल्या, त्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

या मोसमात खराब फॉर्ममुळे व्यंकटेशलाही वरच्या फळीपासून मधल्या फळीपर्यंत पोसण्यात आले, पण त्याच्या खेळात कोणताही बदल झाला नाही. या मोसमात संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण अय्यर ठरत आहे, त्याच्या बॅटने आतापर्यंत एकही मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही.

Leave a comment

Your email address will not be published.