टाटा मोटर्सने ग्राहकांना मोठा झटकाचंच दिला आहे. कंपनीने आपल्या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा करत कंपनीने शनिवारपासूनच कारच्या किमती वाढणार असल्याचे सांगितले. याचे कारण वाहन बनवण्याच्या खर्चात वाढ झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे सांगण्यात आले आहे.

यात त्यांनी कारच्या किंमतीत व्हेरिएंट आणि मॉडेलनुसार सुमारे १.१ % वाढवल्या आहेत. ही दरवाढ शनिवार २४ एप्रिल २०२२ म्हणजे आजपासूनच लागू करण्यात येणार आहे. अशाप्रकारच्या दरवाढीने कंपनीने नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एकप्रकारचा धक्काच दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ कोणकोणत्या गाड्यांच्या किमती कशाप्रकारे वाढल्या आहेत.

टाटा मोटर्सने सर्व मॉडेल्सच्या किमतींमध्ये किरकोळ वाढ केली आहे, परंतु कंपनीने कोणतीही तपशीलवार किंमत यादी प्रदान केलेली नाही. वाहन बनवण्याच्या खर्चात वाढ झाल्याचे संदर्भ देऊन कंपनीने हा निर्णय घेतला असे विधान केले.

एप्रिलमध्ये ६५ हजार रुपयांची सवलत

Tata Motors एप्रिल महिन्यात ६५,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. ग्राहक Tiago, Tigor, Harrier आणि Safari मधून निवड करू शकतात, जे सर्व एक्सचेंज बोनस, रोख ऑफर आणि कॉर्पोरेट प्रोत्साहनांसह येतात. ही ऑफर २०२१ आणि २०२२ या दोन्ही मॉडेल्सवर उपलब्ध आहे.

लवकरच तीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे

Tata Motors ने अलीकडेच नवीन Curvv इलेक्ट्रिक SUV संकल्पना कार उघड केली. कंपनीने २०२६ पर्यंत पोर्टपोलिओमध्ये १० इलेक्ट्रिक वाहने बसवण्याची घोषणा केली आहे. पुढील २ वर्षात कंपनी ३-४ नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करणार आहे. टाटा मोटर्सने २०२३ पर्यंत विद्यमान ICE मॉडेलवर आधारित २ नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

Leave a comment

Your email address will not be published.