Tata Cheapest Electric Car: देशातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स सर्वसामान्यांसाठी लवकरच स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. जी त्यांची आतापर्यंतची बाजारातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असणार आहे. या कार विषयी सविस्तर खाली जाणून घ्या.

बाजरातील इलेक्ट्रिक कारच्या किमती या खूप महाग आहेत. अशातच टाटा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार कंपनी लवकरच 12.50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची इलेक्ट्रिक हॅचबॅक कार लॉन्च करू शकते.

Tigor EV पेक्षा स्वस्त असेल

माहितीनुसार, कंपनी लवकरच अशी इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे ज्याची किंमत Tigor EV पेक्षा कमी असेल. चालू आर्थिक वर्षात कंपनीने 50,000 ईव्ही कार विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

EVs ची वाढती लोकप्रियता

ऑटो सेक्टरमध्ये ईव्ही कारची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. 2019 या आर्थिक वर्षात एकूण दोन हजार ईव्ही वाहनांची विक्री झाली होती, तर यावर्षी आतापर्यंत 20 हजारहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. या आर्थिक वर्षात 50 हजार वाहनांची विक्री होण्याची शक्यता आहे.

टाटा एका विशेष योजनेवर काम करत आहे

स्वदेशी कंपनी टाटा ने आत्तापर्यंत 17 हजार वाहने विकली असून FY23 मध्ये कंपनीचे 50 हजार ईव्ही वाहने विकण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी साणंद प्लांटमधून तीन लाख युनिट्सची अतिरिक्त क्षमता मिळविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

टाटा ईव्ही कार

सध्या, टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत दोन ईव्ही कार विकते. यामध्ये टाटा नेक्सॉन, टिगोर यांचा समावेश आहे. टिगोर ईव्ही एका चार्जवर 306 किमी पर्यंतची रेंज देते. ही ईव्ही केवळ 65 मिनिटांत शून्य ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. Nexon EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे. Nexon EV ची प्रास्ताविक एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये आहे आणि फास्ट चार्जरने फक्त 60 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येतो.