मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, MeToo खुलाशानंतर तिला मारण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर ‘Metoo’ मोहिमेअंतर्गत लैंगिक छळाचा आरोप केला होता. तनुश्री दत्ताने याआधी नाना पाटेकर आणि त्यांचे बॉलीवूड माफिया मित्र आपल्याला काही झाले तर जबाबदार असतील असे म्हटले होते.

कारच्या ब्रेकशी छेडछाड करण्यात आली

तनुश्री दत्ताने मुलाखतीत सांगितले की, ती जेव्हा उज्जैनमध्ये होती तेव्हा अनेकदा तिच्या कारच्या ब्रेकशी छेडछाड करण्यात आली होती. एफएम कॅनडासोबतच्या संभाषणात अभिनेत्रीने खुलासा केला की, “माझा एक अतिशय वाईट अपघात झाला होता, ज्यामध्ये मला खूप दुखापती झाल्या. या दुखापतींमधून बरे होण्यासाठी मला अनेक महिने लागले कारण माझे खूप रक्त वाया गेले होते.”

मोलकरणीने विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला

तनुश्री दत्ताने सांगितले की, तिला विष देऊन जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. ती म्हणाली, “माझ्या घरात एक मोलकरीण होती, जिला माझ्या घरात लावले होते. ती मोलकरीण घरात आल्यापासून मी हळूहळू आजारी पडू लागले. ती माझ्या पाण्यात काहीतरी करत मिसळत असल्याचा मला संशय आहे.

नाना पाटेकरांवर आरोप झाले

एंटरटेनमेंट न्यूजच्या वृत्तानुसार, ‘MeToo’ मोहिमेदरम्यान तनुश्री दत्ताने 2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. नंतर त्यांनी या अभिनेत्याविरोधात तक्रारही केली होती, पण यात काहीही झाले नाही. बाब मात्र, नाना पाटेकर यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. या घटनेनंतर तनुश्री दत्ता चित्रपटसृष्टीतून गायब झाली.