तुती पदार्थाचे दररोज सेवन केल्याने आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते. पण काही लोकांना याबद्दल फारशी माहिती नसते. त्यामुळे आम्ही तुम्हाला तुती पदार्थाचे आहारात समावेश केल्याने शरीराला कोणते फायदे होतात त्या बद्दल सांगणार आहोत.

त्यांची चव द्राक्षासारखीच असते. त्यात भरपूर पोषक आणि जीवनसत्त्वे असतात. एक कप कच्च्या तुतीमध्ये फक्त ६० कॅलरीज असतात ज्यामुळे ते एक आदर्श स्नॅक बनते.

तुतीमध्ये असलेले पोषक घटक तुमच्या ऊतींना आवश्यक ऑक्सिजन पुरवतात. हे तुमच्या ऊतींचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते. चला तर मग आज जाणून घेऊया तुतीचे फायदे.

पचनासाठी फायदेशीर

तुतीमध्ये भरपूर फायबर आढळते, जे योग्य पचनासाठी आवश्यक आहे. त्यामुळे बद्धकोष्ठता, फुगवणे आणि पोटाच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

कर्करोगाचा धोका कमी करते

तुतीमध्ये भरपूर प्रमाणात एन्थोसायनिन्स असतात, जे कर्करोगाच्या पेशींना तुमच्या शरीरापासून दूर ठेवतात. त्यामध्ये रेझवेराट्रोल देखील आहे, ज्यामध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म आहेत. अशा प्रकारे, ते कोलन कर्करोग, त्वचेचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि थायरॉईडशी लढण्यास मदत करतात.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

तुम्हालाही तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित ठेवायची असेल, तर पांढरी तुती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. पांढऱ्या तुतीमध्ये असलेले काही रसायने टाइप-२ मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांप्रमाणेच असतात.

रक्ताभिसरण

तुतीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे आपले रक्त पातळ करण्यास मदत करतात. यामुळे हृदयापासून शरीराच्या इतर भागांमध्ये रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते. तुतीमध्ये भरपूर लोह असते आणि लोहाची उपस्थिती लाल रक्तपेशींच्या निर्मितीस प्रोत्साहन देते.

प्रतिकारशक्ती

तुतीमध्ये मॅंगनीज आणि झिंक मुबलक प्रमाणात आढळतात. तुती आपली रोगप्रतिकारक शक्ती सतर्क ठेवते. तुतीमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक आहे.

Leave a comment

Your email address will not be published.