पावसाळ्यात केसांशी निगडित विविध समस्या जाणवत असतात. त्यातीलच एक म्हणजे केसांचे गळणे, या ऋतूत वातावरणातील सततच्या ओलाव्यामुळे केसगळतीचे प्रमाण खुप जास्त वाढत असते.

यासाठी पावसाळ्यात नेहमी केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे. या काळात केसगळतीपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता. चला जाणून घेऊया.

पावसाळ्यात केस गळती रोखण्यासाठी टिप्स

पावसाच्या पाण्यापासून केस वाचवा

पावसाळ्यात केसांची काळजी घेण्याचा पहिला नियम म्हणजे पावसाच्या पाण्यापासून केसांचे संरक्षण करणे. खरे तर पावसाचे पाणी दिसते तितके स्वच्छ नसते. हे केस गळण्याचे प्रमुख कारण बनू शकते.

रासायनिक उपचार टाळा

जर तुम्ही पावसाळ्यात केसांना परमिंग किंवा केसांचे कोणतेही रासायनिक उपचार करण्याचा विचार करत असाल तर ते ताबडतोब रद्द करा. असे केल्याने केस गळण्याची शक्यता आणखी वाढू शकते.

क्रिएटिव हेअरस्टाइल

हेअर पिन, रबर बँड इत्यादी लावल्याने अनेक वेळा केस ओढू लागतात आणि तुटतात. या ऋतूत केसांशी थोडे हळुवारपणे वागले आणि केस बांधण्यासाठी सिल्क स्कार्फ किंवा अशा काही गोष्टी वापरल्या तर बरे होईल.

आळशी होणे टाळा

पावसाच्या पाण्यामुळे केस ओले होत असतील तर आळशी न होता केस चांगले धुवा. असे न केल्यास केस गळतात.

शॅम्पू कमी आणि कंडिशनर जास्त वापरा

पावसाळ्यात केस कोरडे पडू नयेत म्हणून कमी शॅम्पू वापरा आणि अधिकाधिक केसांमध्ये कंडिशनर वापरा. यामुळे केस मऊ राहतील आणि तुटणार नाहीत.

आहाराची काळजी घ्या

खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करा.