नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकात संघाच्या अपयशानंतर बीसीसीआयने काही मोठी पावले उचलली, आणि सध्याच्या निवड समितीला बरखास्त करून यासाठी तत्काळ अर्जही मागवले, ज्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर होती. मात्र आता समोर आलेल्या वृत्तामुळे निवडकर्त्यांची घोडदौड अधिकच रंजक झाल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने निवडकर्ता होण्याच्या शर्यतीत उडी घेतली आहे. […]