नवी दिल्ली : T20 World Cup 2022 संपला आहे इंग्लंडने या स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. या सगळ्या दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट (ICC) ने T20 विश्वचषक 2022 मधील सर्वोत्तम खेळणाऱ्या 11 खेळाडूंची घोषणा केली आहे. या विशेष संघात आयसीसीने टीम इंडियाच्या 3 खेळाडूंना स्थान दिले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट (ICC) ने T20 विश्वचषक 2022 च्या सर्वोत्कृष्ट खेळणाऱ्या 11 मध्ये सलामीवीर म्हणून जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सची निवड केली आहे. इंग्लंडच्या या सलामीवीरांनी 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. टीम इंडियाविरुद्धही या दोन्ही खेळाडूंनी स्वबळावर १० विकेटने सामना जिंकला होता.

आयसीसीने या संघाच्या टॉप ऑर्डरसाठी विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावांची घोषणा केली आहे. २०२२ च्या टी२० विश्वचषकात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवनेही 6 सामन्यात 239 धावा केल्या.

न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स, झिम्बाब्वेचा स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा आणि पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज शादाब खान यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) प्लेइंग 11 च्या खालच्या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. या तिन्ही खेळाडूंसाठी ही स्पर्धा अतिशय यशस्वी ठरली.

T20 विश्वचषक 2022 च्या सर्वोत्कृष्ट प्लेइंग 11 मध्ये, गोलंदाज एनरिच नॉर्टजे, इंग्लंड क्रिकेट संघाचा मार्क वुड, पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी आणि टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग हे स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.