नवी दिल्ली : T20 World Cup 2022 च्या सेमीफायनल सामन्यापूर्वी इंग्लंड विरुद्ध भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाला एक मोठा सल्ला दिला आहे, ज्यामुळे त्यांना हा शानदार सामना जिंकता येईल. सुनील गावस्कर यांचे म्हणणे आहे की, इंग्लंडविरुद्धच्या T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून अक्षर पटेलला सोडून वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला संधी दिली पाहिजे.

T20 विश्वचषक 2022 मध्ये अक्षर पटेलची कामगिरी फ्लॉप राहली आहे. अक्षर पटेलने T20 विश्वचषक 2022 च्या 4 सामन्यात फक्त 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचवेळी बॅटिंगमध्येही फ्लॉप दिसला आहे. सध्याच्या T20 विश्वचषकातील 4 सामन्यांमध्ये अक्षर पटेलच्या बॅटमधून फक्त 9 धावा निघाल्या आहेत. T20 विश्वचषक 2022 मध्ये दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाची भरपाई करण्यासाठी अक्षर पटेलला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली होती, परंतु तो सपशेल अपयशी ठरला आहे.

दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी एका खाजगी हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, अक्षर पटेलला गोलंदाजीसाठी फक्त दोनच षटके मिळत असल्याने त्याला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात यावे. अक्षर पटेलऐवजी वेगवान गोलंदाज अष्टपैलू हर्षल पटेलला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यावी, ज्यामुळे त्यांचा वेगवान गोलंदाजी विभाग मजबूत होईल, असे सुनील गावसकर यांचे मत आहे.

सुनील गावस्कर म्हणाले, ‘जर अक्षर पटेल टीम इंडियासाठी 7व्या क्रमांकावर धावा करू शकत नसेल आणि फक्त 2 षटके टाकत असेल तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्याचा काही फायदा नाही. जर टीम इंडिया अक्षर पटेलचा योग्य वापर करू शकत नसेल, तर 3 ते 4 षटके टाकणाऱ्या गोलंदाजाला संधी द्यावी. टीम इंडियाला आपल्या गोलंदाजी विभागाचा थोडा विचार करावा लागेल की दोन फिरकी गोलंदाजांना एकत्र खेळवणे योग्य आहे का. अशा परिस्थितीत अक्षर पटेलऐवजी तुम्ही हर्षल पटेलला संधी द्या.