नवी दिल्ली : 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. भारत आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर या स्पर्धेत पाकिस्तानचा पुढचा प्रवास खडतर असणार आहे. सुपर-12 फेरीत पाकिस्तानला दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स आणि बांगलादेशविरुद्ध सामने खेळायचे आहेत. हे तीन सामने जिंकूनही पाकिस्तानला भारतासह अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

पाकिस्तानने तिन्ही सामने जिंकल्यानंतरही दक्षिण आफ्रिका किंवा झिम्बाब्वे यांच्यापैकी कोणालाही तीनपैकी दोन सामने गमावावे लागतील. जर दक्षिण आफ्रिका किंवा झिम्बाब्वेने प्रत्येकी दोन सामने जिंकले तर पाकिस्तान दोन्ही संघाना गुणतालिकेत मागे सोडू शकणार नाही. यावेळी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय नोंदवावा, अशी पाकिस्तानच्या चाहत्यांची इच्छा आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर पाकिस्तानच्या आशा पल्लवीत होईल. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेने प्रत्येकी दोन सामने गमावावेत अशी पाकिस्तानची इच्छा आहे.

T20 विश्वचषक 2022 च्या 24 व्या सामन्यात पाकिस्तानचा सामना पर्थ क्रिकेट मैदानावर झिम्बाब्वेशी झाला. या सामन्यात पाकिस्तान संघाचा 1 धावांनी पराभव झाला. या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग इर्विनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 8 बाद 130 धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य ठेवले.

टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ : मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह , शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद.