मुंबई : साऊथ अभिनेत्री काजल अग्रवालने काही दिवसांपूर्वी ती प्रेग्नंट असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज काजल आणि तिचा पती गौतम किचलू हे आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याच्या घरी एका गोंडस मुलाने जन्म घेतला आहे.

बातम्यांनुसार, या जोडप्याला मुलगा झाला आहे. मात्र, अद्याप या स्टार कपलने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. फिल्मस्टार काजल अग्रवाल तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात होती. सुमारे 5 दिवसांपूर्वी, अभिनेत्रीने एक लांब सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आणि गरोदरपणाच्या प्रवासात तिला पाठिंबा देण्यासाठी तिचा पती गौतम किचलू यांना एक अतिशय गोड नोट लिहिली होती.

2022 च्या सुरुवातीसोबतच फिल्म स्टार काजल अग्रवाल हिने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती. अभिनेत्रीने तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. अभिनेत्रीच्या या घोषणेपासून चाहते या मेगा न्यूजची वाट पाहत होते.

दरम्यान, काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांचे २०२० मध्ये लग्न झाले. दोन्ही स्टार्सचे लग्न हे साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या लग्नांपैकी एक होते. लग्नाच्या दीड वर्षानंतरच अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Leave a comment

Your email address will not be published.