महाअपडेट टीम, 9 फेब्रुवारी 2022 : राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे पंचक्रोशीतील इयत्ता आठवीच्या शिष्यवृती परीक्षेत ओमकार ज्ञानेश्वर अंञे,स्वराज संदीप अंञे,ओम अरुण दिघे,अनुष्का मधुकर अंत्रे,अफिफा शकूर तांबोळी यांनी गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल व तसेच शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने प्रवरा संस्थेचे अध्यक्ष व माझी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून

महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी जैवतंञज्ञान च्या राष्ट्रीय कांदा व लसून संशोधनासाठी राष्ट्रीय पातळीवर कु तन्वी विनोद अंत्रे व सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एस साठी कु साक्षी रवींद्र ताजणे यांची निवड झाल्याबद्दल स्वरूप सामाजिक विचारधारा फौंडेशन सोनगाव ग्रामपंचायत व सोनगाव ग्रामस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रात काम करणारे व नुकतीच श्री संत सावता माळी युवक संघाच्या राहुरी तालुकाध्यक्ष पदी श्री शामराव पाटील अंत्रे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा हि यावेळी सन्मान करण्यात आला.या सर्व विद्यार्थीना पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रोहत्सान मिळावे या उदेशाने फौंडेशनच्या वतीने नेहमीच आशा विद्यार्थांचा गुणगौरव केला जातो.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शाल पुष्पगुच्छ सह भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.माजी मंञी राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने ही राजेंद्र अनाप यांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपानराव अंञे हे होते.

यावेळी सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप,सावता पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मण अंञे शिक्षक बॅंकेचे मा चेअरमन साहेबराव अनाप,बिपीन ताठे रवींद्र ताजणे,शकुरभाई तांबोळी यांची भाषणे झाली.

तसेच वसंत अंञे,पोलीस पाटील संतोष अंञे,शरद अंञे,संदीप अनाप,ऋषीकेश अंञे,पाराजी अंञे,संदीप अंञे सर,सोसायटीचे व्हा चेअरमन विनोद अंञे,दिनकर अंञे,अरूण दिघे,शामराव अंत्रे,महेंद्र अनाप, सुनिता ताजणे,भारती अंञे यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. फौंडेशन चे अध्यक्ष तथा उपसरपंच किरण पाटील अंञे यांनी आभार मानले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *