मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चागलंच तापलेलं दिसत आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकारणात शिवसेनेला मोठा झटका बसला. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदारही आहेत. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वसामान्यांपासून ते दिग्गज व्यक्ती आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. बॉलीवूडनेही या प्रकरणात उडी घेतली असून, त्याअंतर्गत उद्धव ठाकरे सरकारबाबत सर्व सेलिब्रिटी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. नुकतेच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर आणि सिमी गरेवाल यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले आहे, त्यामुळे या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने दोन्ही अभिनेत्रींनवर संताप व्यक्त केला आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी स्वरा आणि सिमी गरेवाल यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अशोकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या दोन अभिनेत्रींच्या वक्तव्याचे स्क्रीन शॉट घेत ट्विट केले आहे. चित्रपट निर्मात्याने लिहिले आहे की, “बॉलिवुडची पीआर एजन्सी महाविकास आघाडी सरकारला वाचवण्यासाठी एकवटली आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी शिवसैनिकांना गुंडा मवाली म्हटले होते. मला खात्री आहे की त्यांना एका ट्विटसाठी खूप मोठी रक्कम मिळाली असेल. आणखी एका ट्विटमध्ये अशोकने म्हटले आहे की, ‘फक्त पीआर टीमवर विसंबून राहू नका, थोडे स्वत:ला वाचा, लोकांनी दुसऱ्या पक्षाला जिंकण्यासाठी मतदान केले होते पण त्यांनी जनतेची फसवणूक केली आणि शत्रूंना सोबत घेऊन सरकार बनवले.”

स्वरा आणि सिमी यांचे वक्तव्य

खरं तर, स्वरा भास्करने तिच्या वक्तव्यात म्हटलं होतं की, ‘हे काय आहे, मग आम्ही मतदान का करतो. 5 वर्षे निवडणुकीऐवजी थेट विक्री का ठेवली नाही. दुसरीकडे सिमी गरेवाल म्हणाली होती की, ‘उद्धव ठाकरेंना सत्तेचा लोभ नाही, त्यामुळे ते जास्त राजकारण करत नाहीत. त्यांच्यासारखा तत्त्वनिष्ठ नेता राजकारणात मिळणे कठीण आहे.”

Leave a comment

Your email address will not be published.