महाअपडेट टीम, 28 जानेवारी 2022 : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेच्या 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने भाजपला मोठा दिलासा मिळाला असून ठाकरे सरकारला मोठा दणका बसला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोनदा सुनावणी झाली होती. आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

या आमदारांना मिळाला दिलासा….

आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया…

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा केल्याने, अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, अध्यक्ष भास्कर जाधव असंसदीय वर्तन केल्याचा ठपका ठेवून भाजपच्या बारा आमदारांचं 5 जुलै 2021 रोजी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं.

या कारवाईविरोधात सर्व 12 आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे निलंबन रद्द करत राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे.

काय म्हणालं सुप्रीम कोर्ट :-

अशाप्रकारचे निलंबन करणे म्हणजे लोकशाहीमध्ये चुकीचा पायंडा पडू शकतो. आमदारांना 60 दिवसांपेक्षा निलंबित करणे म्हणजे तो बडतर्फ झाल्यासारखे आहे. त्यामुळे कुठलाही मतदारसंघ हा सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ विनाप्रतिनिधी राहणं अयोग्य आहे. म्हणूनच आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करणं चुकीचं आहे’, असंही कोर्टाने नमूद केलं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *