आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा असूनही कोणत्याही टीमने संधी न दिल्याने भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना वर सध्या कॉमेंट्री करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान कॉमेंट्रीसाठी आलेल्या सुरेश रैनानं प्रिती झिंटावर कमेंट केली. ज्यामुळे तो अडचणीत सापडला आहे.
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कॉमेंट्री करणारा स्टार फलंदाज सुरेश रैनाने लाईव्ह शोमध्ये प्रिती झिंटावर बोलताना एक अशी काही कमेंट केली ज्यामुळे तो चर्चेत आला. रैनानं केलेली ही कमेंट इरफान पठानला अजिबात आवडली नाही. रैना जे बोलला त्यावर इरफान पठाण संतापला आणि त्याने शो सोडण्याची धमकी दिली.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार एका सामन्या दरम्यान झाला. यावेळी इरफान पठाण लाईव्ह शोमधून जाऊ नयेत म्हणून रैनाला त्याला मनवण्याची वेळ आली. रैना इरफानची नाराजी दूर करण्यात यशस्वी झाला आणि दोघंही हसू लागले. खरं तर इरफान रैनावर नाराज नव्हता. त्याने रैनाला एप्रिल फूल करण्याचा प्लॅन केला होता. त्याचा एक भागा हा होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.