महाअपडेट टीम, 3 मार्च 2022 : ट्रॅंन्टर व्यवस्थापनाने अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता 15 वर्ष परमनंट काम करणाऱ्या 10 कामगारांना कमी करून त्यांच्या जागेवर 30 कॅज्युअल भरून काम चालू केले आहे.

अनेक दिवस सकारात्मक चर्चा लवकरच करू अशी अपेक्षा दाखवून व्यवस्थापनाने कामगारांना सातत्यपूर्ण फसवण्याचे काम कंपनी व्यवस्थापनाने केलेले आहे.

त्यामुळे व्यवस्थापनाच्या विरोधात कामगार आणि त्यांचे सहकुटुंब आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. जिल्हा परिषद सभापती सुजाता भाभी पवार तसेच मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते अनेक संघटना व त्यांच्या कामगारांनी येऊन पाठिंबा दिला.

या आधी कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी याची दखल घेत कामगार मंत्री माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब यांना याबाबत निवेदन दिले. माननीय मंत्री महोदयांनी पुणे अप्पर कामगार आयुक्त यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच माननीय जिल्हाधिकारी यांना सदर विषयात लक्ष घालून कमी केलेल्या दहा कामगारांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्यासाठी कंपनीला सूचना द्यावा यासाठी विनंती सुद्धा या आधीच आमदार साहेबांनी केली होती.

त्या अनुषंगाने कंपनी व्यवस्थापक आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत उद्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.

शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथील ट्रॅन्टर इंडिया प्रा. लि. या कंपनीने ऑक्टोंबर 2020 मध्ये दहा कायमस्वरूपी कामगारांना बेकायदेशीरपणे कमी केले होते. कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी याची दखल घेत माननीय जिल्हाधिकारी यांना सदर विषयात लक्ष घालून कमी केलेल्या दहा कामगारांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्यासाठी कंपनीला सूचना द्यावा यासाठी विनंती केली होती.

त्या अनुषंगाने कंपनी व्यवस्थापक आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत उद्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *