तुम्हाला माहीत आहे की उसाच्या रसाचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात. परंतु यासोबतच उसाचा रस आपल्या त्वचेसाठीही फादेशीर ठरत आहे. उसाचा रस पिण्यासोबतच चेहऱ्यावर लावल्यानेही एक वेगळीच चमक दिसून येते. व यामुळे त्वचेशी निगडित सर्व समस्या दूर होतात.
याने चेहऱ्यावरील पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात, असे अनेक फायदे उसाचा रस पिल्याने किंवा लावल्याने होतात. चला तर मग जाणून घेऊयात उसाचे अन्य फायदे.
१. मुरुमांची समस्या दूर करते
यामुळे मुरुमांच्या समस्येवर मात करता येते. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेतील तेल काढून टाकण्यास प्रभावी आहेत.यासाठी एका भांड्यात मुलतानी माती घ्या. आता त्यात उसाचा रस घाला. दोन्ही घटक चांगले मिसळल्यानंतर चेहऱ्याला लावा. साधारण १५-१२ मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकू शकते.
२. सुरकुत्याची समस्या दूर करते
वाढत्या वयाच्या लक्षणांना कमी करण्यासाठी उसाचा रस गुणकारी आहे. उसाचा रस नियमित प्यायल्याने तुमची त्वचा तरुण आणि लवचिक राहते. उसाचा रस चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या आणि बारीक रेषांची समस्या दूर होते. त्याचा वापर करण्यासाठी उसाचा रस कापसावर लावावा. आता या कापसाने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. साधारण १० ते २० मिनिटे उसाचा रस चेहऱ्यावर राहू द्या. यामुळे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होतील.
३. गडद डागांसाठी ऊस
उसाचा रस प्यायल्याने त्वचेवरील डागांची समस्या दूर होते. वास्तविक, उसाच्या रसामध्ये ग्लायकोलिक ऍसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करते आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते. चेहरा धुतल्यानंतर, उसाचा रस कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. २० मिनिटे राहू द्या आणि मऊ टॉवेलने पुसून टाका. उत्तम परिणामांसाठी हा रस आठवड्यातून किमान तीनदा लावा.
४. केसांच्या वाढीसाठीही उसाचा रस फायदेमंद
उसाचा रस फक्त त्वचेसाठीच फायदेशीर नाही, तर तुमच्या केसांच्या वाढीसाठीही तो खूप चांगला असू शकतो. वास्तविक, उसाच्या रसामध्ये उच्च आर्द्रता असते, जी तुमचे केस नैसर्गिकरित्या कंडिशनिंग करण्यास मदत करते. हे टाळूचे पोषण देखील करते, ज्यामुळे टाळूचा कोरडेपणा दूर होतो. उसाचा केसांवर रस चोळा किंवा दह्या सोबतही लावू शकता.