गर्भधारणेनंतर असो की वजन कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान किंवा अन्य कोणत्या वेगळ्या कारणामुळे शरीरावर स्ट्रेच मार्क्स दिसतात. जे सहजा- सहजी जात नाहीत. व ते दिसायलाही खूपच कुरूप दिसतात.

हे स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी महिला अनेक केमिकलयुक्त पदार्थांचा वापर करतात. परंतु त्यांचा परिणाम त्वचेवर फार काळ दिसून येत नाही. अशा स्थितीत स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी तुम्ही काही योगासनेही करू शकता. चला जाणून घेऊया या योगासनांबद्दल…

विपरित करणी

योगा चटईवर झोपा. आपले पाय आणि हात सरळ ठेवा. आता हळूहळू दोन्ही पाय आणि नितंब वर करा. हात जमिनीवर ठेवून कमरेला आधार द्या. काही वेळ या आसनात राहून पुन्हा त्याच स्थितीत या.

उत्कटासन

हे आसन करण्यासाठी पायांना थोडे अंतर देऊन योगा चटईवर सरळ उभे रहा. थोडे खाली झुका. हात समोरच्या दिशेने सरळ ठेवा. हे आसन करताना खुर्चीची मुद्रा होईल. काही काळ या स्थितीत रहा आणि नंतर सुरुवातीच्या स्थितीत परत या.

सर्वांगासन

हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपा. हे आसन करण्यासाठी कंबर, नितंब आणि पाठ वरच्या दिशेने करा. हात पाठीमागे ठेवा आणि खांद्यांना आधार द्या. कंबर आणि पाय सरळ करा. मानेवर कोणतेही वजन नसावे. काही वेळ या आसनात राहा आणि नंतर त्याच स्थितीत परत या.

हस्त पदांगुष्ठासन

हे आसन करण्यासाठी जमिनीवर झोपावे. एका बाजूला वळण घ्या. आता एक हात आणि पाय वर करा. हात आणि पायांच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काही काळ या पोझमध्ये राहा, नंतर दुसऱ्या बाजूला वळण घ्या आणि तीच प्रक्रिया पुन्हा करा.