थंडीला पडायला सुरुवात होतात बरेच लोक हे सर्दी- खोकला यांसारख्या समस्येने त्रस्त होतात. त्यात सर्दी झाली म्हंटलं की अशात अनेकांना नाकाच्या समस्यांचा जसे की शिंका येण्याचा त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा या शिंका थांबण्याचे नावच घेत नाहीत. त्या सलग व सतत येऊ लागतात.

शिंका येणे काही काळ थांबवता येत असले तरी ते पूर्णपणे थांबवणे कठीण असते. पण शिंका थांबवण्यासाठी घरगुती गोष्टी वापरता येतात. या आज आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया वारंवार शिंकण्याच्या समस्येवर कशी मात करावी?

या घरगुती उपायांनी करा शिंकांच्या समस्येपासून सुटका

व्हिटॅमिन सी घ्या

व्हिटॅमिन सी अनेक लिंबूवर्गीय फळे आणि भाज्यांमध्ये आढळते. ज्या लोकांना वारंवार शिंकण्याची समस्या आहे त्यांनी व्हिटॅमिन सीचे सेवन करावे. अशा परिस्थितीत, व्हिटॅमिन सीच्या पुरवठ्यासाठी पूरक आहार देखील वापरला जाऊ शकतो.

नाक बंद करा

जर तुम्हाला वारंवार शिंक येत असेल तर तुमचे नाक दोन्ही बाजूंनी 5 ते 10 सेकंद दाबून बंद करा, असे केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. यामुळे शिंका येणे थांबू शकते. त्याच वेळी, नाक बंद करताना, वरच्या दिशेने पहा, असे केल्याने काही वेळात शिंका येणे बंद होईल.

कॅमोमाइल चहा घ्या

ग्रीन टी प्रमाणे, कॅमोमाइल चहा देखील पोषक तत्वांनी समृद्ध आहे, त्यात मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे शिंका येण्यापासून बचाव होतो. त्याच वेळी, ते फ्लूमध्ये देखील सेवन केले जाते.