आपण पाहतो की वातावरणातील बदलामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर बदलत्या हवामानाचा परिणाम त्वचेवरही होत असतो. जसे आता सुरु होणाऱ्या हिवाळ्यामुळे त्वचा कोरडी पडते व त्वचेला तडे पडू लागतात.

याकाळात केवळ चेहराच नाही तर हात-पायांची त्वचाही तडकायला लागते. अशा स्थितीत अनेकांना खाजही वाढते. हायड्रेशन आणि आर्द्रतेच्या कमतरतेमुळे या समस्या उद्भवतात. या कोरड्या त्वचेसाठी अनेक घरगुती उपाय आहेत, ज्याचा तुम्ही अवलंब करू शकता. चला जाणून घेऊया…

नारळ तेल

जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल तर त्या भागात खोबरेल तेल वापरा. नारळाच्या तेलामुळे तुमच्या त्वचेच्या भेगा पडण्याची समस्या दूर होईल. रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल गरम करून संपूर्ण शरीरावर लावावे. यामध्ये असलेले फॅटी अॅसिड्स त्वचेला आर्द्रता वाढवण्यास आणि मॉइश्चरायझ करण्यास मदत करतात.

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल तुमच्या त्वचेची समस्या तर दूर करेलच पण केसांच्या समस्याही दूर करेल. तुमच्या नाभीमध्ये मोहरीचे तेल लावा, त्यामुळे तुमची त्वचा चांगली होईल. असे केल्याने रक्ताभिसरण चांगले होते आणि कोलेजनला चालना मिळते. यामुळे तुमच्या त्वचेला ग्लो येतो.

देशी तूप

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला देसी तूप लावा. यामध्ये असलेले फॅटी अॅसिड त्वचेतील आर्द्रता वाढवते, ज्यामुळे ती चमकते. असे रोज केल्याने तुमची त्वचा कायमची चांगली राहू शकते.

कोरफड

कोरफडीचा गर लावल्याने तुमच्या त्वचेतील आर्द्रता टिकून राहते. हे त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि अनेक समस्यांपासून दूर ठेवते. कोरफड एक्झामाच्या समस्येवर प्रभावी ठरू शकते. कोरफडीचे जेल तुम्ही हात आणि पायांवर देखील लावू शकता.

ग्लिसरीन

त्वचेवर ग्लिसरीन लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. तसेच त्वचा सुधारण्यास मदत होते. एक्जिमामध्येही हे गुणकारी आहे. रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी चेहऱ्यावर किंवा हात-पायांवर लावल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.