प्रत्येकालाच आपले घर साफ व स्वच्छ ठेवायला आवडते. तेव्हाच आपल्याला घरात प्रसन्नता वाटते. मात्र साफसफाई करताना घरातील काही डाग हे खूप तीव्र व हट्टी असतात व ते सहजासहजी निघत नाहीत.जसे की भाजीचे, मसाल्याचे, चहाचे डाग निघत नाहीत. त्यामुळे घरात अस्वच्छता वाटू लागते. पण तुम्हाला माहीत आहे का की यावर काही घरगुती उपाय करूनही हे डाग घालवता येऊ शकतात.

यासाठी आम्ही तुम्हाला यांसारखे हट्टी डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहे. ज्याच्या वापराने तुमच्या घरातील हट्टी डाग निघून जातील व याने तुमच्या घराच्या स्वच्छतेत भर पडेल.चला तर मग जाणून घेऊ या डागांविषयी व त्यावरील घरगुती उपायांविषयी.

चहाचे डाग

चहाचे डाग सहसा सहजासहजी निघतच नाहीत, मग ते कपड्यांवर पडले किंवा जमिनीवर पडले. जमिनीवर चहा सांडल्यामुळे झालेले डाग तुम्ही सहज काढू शकता. चहा पडलेल्या ठिकाणी मिठाच्या पाण्याने घासून घ्या. डाग पूर्णपणे स्वच्छ होईल.

च्युइंग गम डाग

एखाद्या ठिकाणी च्युइंग गम चिकटून राहिल्यावर ती काढली तर ती जागा चिकट तर होतेच पण तिथे काळे डाग पडतात. हा डाग चोळल्यानंतरही जात नाही. अशा स्थितीत तुम्ही च्युइंगमच्या डागावर बर्फ चोळल्याने त्याचा डाग घट्ट होतो आणि काही वेळात बाहेर येतो.

फर्निचरवरील डाग

फर्निचरवरील सनमायका सामान्यतः ओलसर कापडाने स्वच्छ केले जाते. चांगल्या स्वच्छतेसाठी टूथ पावडर टाकून स्वच्छ केल्यावर त्यावरील डाग लगेच साफ होतात. त्यानंतर कोरड्या कापडाने पुसून टाका.

वॉश बेसिन साफ ​​करणे

वॉश बेसिनची नियमित साफसफाई केली नाही तरी त्यात काळपटपणा दिसू लागतो. त्याची नियमित स्वच्छता आवश्यक आहे. ते स्वच्छ करण्यासाठी स्पंजच्या चौकोनी तुकड्यावर एक चमचा वॉशिंग पावडर टाका आणि त्या तुकड्यावर ४-६ थेंब पाणी टाकून वॉश बेसिन स्वच्छ करा. हे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करा.

Leave a comment

Your email address will not be published.