महाअपडेट टीम, 2 मार्च 2022 :शिरूर:तालुक्याचे आमदार म्हणून तसेच खरेदी विक्री संघासह तालुक्यात इतर संस्था स्थापन करून त्या वाढवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या माजी आमदार रावसाहेबदादा पवार यांचा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुतळा बसवला जावा असा मानस शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे व त्यांच्या पत्नी संघाच्या सदस्य सुजाता नरवडे यांनी व्यक्त केला.
खरेदी-विक्री संघाने बांधलेल्या’सहकार महर्षी मा.आ.रावसाहेबदादा पवार व्यापारी संकुलाचे’ उद्घाटन आमदार ॲड.अशोक पवार हस्ते करण्यात आले.नगर परिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.माजी आमदार पोपटराव गावडे,जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार,पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडितअण्णा दरेकर,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळेबाजार समितीचे सभापती ॲड.वसंतराव कोरेकर,उपसभापती सतीश कोळपे,माजी सभापती प्रवीण चोरडिया,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे,खरेदी-विक्री संघाचे उपसभापती बाळासाहेब नागवडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपसभापती ॲड.रंगनाथ थोरात,शिरूर शहर विकास आघाडीचे नेते संतोष भंडारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी,ॲड.प्रदीप बारवकर,ॲड.रवींद्र खांडरे,सुरेश
पाचर्णे,सहाय्यक निबंधक शंकर कुंभार,आर्किटेक्ट पवन गांधी,प्रकाश थोरात,स्वाती थोरात,कैलास भोसले,संजय चोरडिया,खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक,व्यवस्थापक आदी यावेळी उपस्थित होते.आपल्या प्रास्ताविकात सभापती नरवडे यांनी माजी आमदार रावसाहेबदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचे आमदार म्हणून तसेच तालुक्यात संस्था उभ्या करण्यासाठी तसेच त्या वाढवण्यासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला.रावसाहेबदादांच्या योगदानाचे प्रतीक म्हणून बाजार समितीच्या आवारात रावसाहेब यांचा पुतळा उभारला जावा असा मानस नरवडे यांच्यासह त्यांची पत्नी सुजाता नरवडे यांनी व्यक्त केला. पुतळ्या बरोबरच खरेदी-विक्री संघाचे ‘रावसाहेब दादा पवार खरेदी विक्री संघ’ असे नामकरण करावे असाही प्रस्ताव नरवडे यांनी यावेळी मांडला.
माजी आमदार गावडे यांनी नरवडे दांपत्याच्या मागणीला पाठिंबा देताना रावसाहेबदादा यांच्या कार्याची पुढच्या पिढीला ओळख रहावी म्हणून पुतळा उभारला पाहिजे असे स्पष्ट केले.गावडे म्हणाले,रावसाहेबदादा यांचेकडे विकासाची दूरदृष्टी होती.त्यांनी तालुक्यात संस्था केवळ उभ्या केल्या नाही,तर त्या वाढवण्यासाठी त्यांनी त्यागाची भूमिका घेतली.रावसाहेबदादांची हीच परंपरा आमदार पवार यांनी पुढे सुरू ठेवली.सभागृहनेते धारीवाल यांनीही रावसाहेबदादांच्या कार्याचा गौरव केला.पवार कुटुंबियांबरोबर तीन पिढ्यांचे संबंध असल्याचे सांगत आमदार पवार आपल्या वडिलांच्या विकासाचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत,
असे स्पष्ट केले.सभापती नरवडे यांनी आमदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तोट्यातील संघ ऊर्जितावस्थेत आणल्याचे सांगितले.संघाचे स्वतःचे पेट्रोल पंप,मेडिकल स्टोअर्स व खताचे दुकान असावे असा मानस व्यक्त करताना न्हावरे येथे व्यापारी गाळे तयार करणार असल्याची माहिती दिली.तळेगाव ढमढेरे येथे व्यापारी संकुलासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.फ्रिटोले कारखान्यात संघाच्या मार्फत बटाटा खरेदी केला जावा.यासाठी आमदारांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा नरवडे यांनी व्यक्त केली.संजय बारवकर यांनी सूत्रसंचालन केले,उपसभापती बाळासाहेब नागवडे यांनी आभार मानले.
आमदार पवार म्हणाले,रावसाहेबदादा पवार यांच्यानंतर चुकीच्या हातांमध्ये संघाची सत्ता गेली.या मंडळींनी संस्थेच्या जमिनी,गोडाऊनची विक्री केली,तरीही संघ तोट्यात होता.राष्ट्रवादीच्या ताब्यात संघ आल्यानंतर गाळात गेलेला संघ बाळासाहेब नागवडे,शरद कालेवार तसेच नरवडे व सहकाऱ्यांनी बाहेर काढला.बाजार समितीही तोट्यात होती.राष्ट्रवादीच्या ताब्यात सत्ता आल्यानंतर शशिकांत दसगुडे,शंकर जांभळकर व सहकाऱ्यांनी काही महिन्यातच समिती फायद्यात आणली.बाजार समितीची आठ कोटी रुपयांची नवीन इमारत उभारली जाणार असल्याची माहिती आमदार पवार यांनी यावेळी दिली.