बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नाच्या इंडस्ट्रीत सध्या जोरदार चर्चा होत आहेत.

याच दरम्यान, लग्नाआधीच रणबीर कपूरचा खास मित्र अयान मुखर्जीने रणबीर आलीयाच्या चाहत्यांना एक जबरदस्त भेट दिली आहे. काय आहे ही भेट चला आपण पाहू.

वास्तविक, अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘केसरिया’ गाण्याचा टीझर शेअर केला आहे. या टीझर व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आलिया भट्टभोवती फिरताना आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.

एवढेच नाही तर दोघेही मंदिरात एकत्र पूजा करताना दिसले. हा व्हिडिओ शेअर करत अयान मुखर्जीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लिहिले की, “या धार्मिक प्रवासासाठी, हे दोघेही लवकरच एकत्र सुरू होणार आहेत.

रणबीर आणि आलिया, जे माझे सर्वात प्रिय मित्र आहेत. आम्ही ‘केसरिया’ केला. या रूपने एक छोटासा भाग शेअर केला आहे. त्याच्या चित्रपटातून तुम्हाला भेट म्हणून.”

आयनने शेअर केलेलं हे गाणं सध्या काही वेळातच ट्रेंडिंगला पाहायला मिळत आहेत. गाण्यातील आलिया रणबीरच्या प्रेमाची झलक पाहून चाहते भारावून गेले आहेत. गाण्यावर अनेक कमेंट करत दोघांप्रति आपले प्रेमही व्यक्त करत आहेत.

दरम्यान, येत्या 17 फेब्रुवारीला आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अनेक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न बंधनात अडकणार आहेत.

रणबीर आपल्या वाडीलांप्रमाणे आरके हाऊसमध्ये लग्न करणार असून या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

 

Leave a comment

Your email address will not be published.