मुंबई : इतरांना मदत करण्यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Soonu sood) तुलना नाही. सोनू सूदने कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून हजारो लोकांना मदत केली आहे. सोनू सूदची ही प्रतिमा आणि मानवी गुणांमुळे, त्याचे चाहते आणि मदत मिळवणारे गरीब कुटुंब दोघेही त्याला मसिहा म्हणू लागले आहेत.
ताज्या प्रकरणात, सोनू सूदने चार पाय आणि चार हात असलेल्या मुलीची मदत केली, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर त्या निष्पाप मुलीचे आयुष्यही बदलले. सोनू सूदच्या याच कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोनू सूद मदत करताना जात, धर्म किंवा जन्मस्थळ बघत नाही. इतरांना मदत करण्याची भावना त्याच्यात इतकी रुजलेली आहे की जेव्हा-जेव्हा सोनूने मदतीसाठी हाक मारली तेव्हा त्याने उत्तर देण्यास किंवा मदतीचा हात पुढे करण्यास उशीर केला नाही. आपण आता बोलत आहोत बिहारच्या नवादा जिल्ह्यातील सौर पंचायतीची रहिवासी असलेल्या कुमारीविषयी, जिला जन्मापासून 4 हात आणि 4 पाय आहेत.
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदला सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती मिळाल्यावर त्याने सर्वांगीण उपचार घेण्याचा निर्णय घेतला. आता सोनू सूदच्या प्रयत्नांचे फळ आहे की अडीच वर्षाच्या चिमुरडीवर यशस्वी शस्त्रक्रिया होऊ शकली.
अडीच वर्षांची कुमारी चाहमुखी सध्या ठीक आहे, तिची प्रकृतीही सुधारत आहे, पण तरीही तिला आणखी काही दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे. यानंतर ती एका सामान्य मुलाप्रमाणे हॉस्पिटलमधून बाहेर पडेल आणि सामान्य मुलाप्रमाणे जगू शकेल. या चिमुरडीवर झालेल्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च सोनू सूदने स्वतः उचलला आहे. यापूर्वी 28 मे रोजी सोनू सूद म्हणाला होता, “टेन्शन घेऊ नका, मी त्या मुलीवर उपचार सुरू केले आहेत. फक्त प्रार्थना करा.”