मुंबई : जगभरात योग दिवस साजरा केला जात आहे. बॉलीवूड सेलेब्सही याबाबतीत मागे नाहीत. योग दिनानिमित्त सर्व स्टार्स आपले फोटो शेअर करून योगाला फिटनेस आणि सकारात्मकतेचे श्रेय देत आहेत. दरम्यान, अभिनेत्री सोनाली सेहगलच्या (Sonali Sehgal) फोटोमुळे सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे.
बोल्डनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनाली सहगलने योगा दिनानिमित्त इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट्स तसेच लाईक्सचा पाऊस पडत आहेत. तसेच या फोटोंच्या कमेंट बॉक्समध्ये फायर इमोजींचा पूर देखील आला आहे.
‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री सोनाली सहगल बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या बोल्डनेसमुळे ती दररोज चर्चेत असते. योग दिनाच्या निमित्ताने सोनालीने तिच्या बोल्डनेसने सर्वांना प्रभावित केले आहे.
समोर आलेल्या या फोटोंमध्ये सोनाली सहगल समुद्रकिनाऱ्यावर योगा करताना दिसत आहे. या दरम्यान, अभिनेत्री काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे आणि तसेच अभिनेत्रीने जाळीचा कपडा परिधान करून लूक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये अभिनेत्री अधिक चमकत आहे.
‘प्यार का पंचनामा’, ‘जय मम्मी दी’ आणि अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसलेली अभिनेत्री सोनल्ली सेगल सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती दररोज तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.