राज्यात वीज निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य लोड शेडिंगच्या दिशेने निघाले आहे. याचहक प्रत्यय नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी येऊ देखील लागला आहे. दरम्यान श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून सतत वीजपुरवठा खंडित होत आहे.
दरम्यान सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने महावितरणने वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी येथील सिंधी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. रमजानचा महिना व उपवास सुरू आहे, रामनवमी जवळ आली आली आहे. तसेच सय्यदबाबांचा उरुसही जवळ आला असून यावर्षी मोठ्या प्रमाणात उरुस व रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे.
याचबरोबर विद्यार्थ्यांच्या परीक्षाही याच काळात सुरू आहेत, खंडित विजेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. वीज महावितरण कंपनीने या सर्व बाबींचा विचार करून वीज पुरवठा खंडित होऊ न देता सुरळीत सुरू ठेवावा, अशी मागणी सिंधी समाजाच्या प्रमुखांनी केली आहे.