मुंबई : बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करशी (Neha kakkar) संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. नेहा कक्करचा नवरा म्हणजेच गायक रोहनप्रीत सिंगचे (Rohanpreet singh)हॉटेलमधून सामान चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. रोहनप्रीत सिंगने याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत त्याने मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचे सांगितले आहे.

नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंग याचे हॉटेलमधून सामान चोरीला गेल्याची बातमी आली आहे. तो शुक्रवारी रात्री हिमाचल प्रदेशातील मंडी येथील हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने हे हॉटेल फक्त रात्रीसाठी घेतले होते. जेणेकरून तो दुसऱ्या दिवशी प्रवास करण्यापूर्वी आराम करू शकेल.

या हॉटेलमधील त्याच्या खोलीतून रोहनप्रीत सिंगचे अॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी चोरीला गेली आहे. तो रात्री खोलीत झोपला, आणि सकाळी उठल्यावर त्याच्या लक्षात आले की टेबलवरून सर्व सामान चोरीला गेले आहे. या गायकाने आपल्या चोरीची तक्रार पोलिसांत दिली आहे.

एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी या चोरीला दुजोरा दिला असून तक्रार नोंदवण्यात आली आहे. तक्रारीनंतर पोलीस हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत असून हॉटेल कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. रोहनप्रीत सिंग स्वतः एक गायक आहे आणि तो त्याच्या गाण्यांच्या आणि शोच्या संदर्भात टूर करत असतो.

अलीकडेच नेहा कक्करने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती हॉटेलच्या खोलीत रोहनप्रीत सिंगसोबत चहा घेत आहे. नेहा अजूनही रोहनप्रीतसोबत असेल असे चाहत्यांना वाटत होते पण चोरीची घटना रोहनप्रीतसोबतच घडली आहे तेथे त्याच्यासोबत नेहा नव्हती.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही रिलेशनशिपमध्ये आल्यापासून रोहनप्रीत सिंग चर्चेत आला होता. त्यांच्या लग्नाची बातमी आधी पसरली होती.

दोघांनी लग्नाआधी लग्नाचे गाणेही रिलीज केले होते आणि त्यानंतर सात फेरे घेतले होते. लग्नानंतर दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. नुकताच या दोघांनी आणखी एक म्युझिक व्हिडिओ लाँच केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published.