मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) गेल्या मोसमात आपल्या वेगवान चेंडूने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा उमरान (Umran malik) मलिक आता चर्चेत आला आहे. आयपीएलच्या या मोसमात त्याने सनरायझर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad)सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आपल्या जलद गतीने आणि धडाकेबाज स्पेलने सर्वांना प्रभावित केले आहे.

यातच आता या खेळाडूचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने देखील या गोलंदाजाचे कौतुक केले आहे. तसेच उमरानने त्याचा विश्वविक्रम मोडला तर त्याला आनंद होईल असेही म्हंटले आहे.

उमरानचे कौतुक करत अख्तर म्हणाला, मला त्याची दीर्घ कारकीर्द पाहायला आवडेल. काही दिवसांपूर्वीच, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकून मी विक्रम केला आणि त्याला आता 20 वर्षे झाली आहे, आणि आजपर्यंत कोणीही तो विक्रमन मोडू शकला नाही.

आणि जर आता मी केलेला हा विक्रम उमरानने मोडला तर मला खूप आनंद होईल. पण या काळात त्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, दुखापतीशिवाय त्याला आपली कारकीर्द लांबवायची आहे. शोहेब अख्तर त्याच्या सर्वात वेगवान चेंडू टाकण्याच्या विक्रमाबद्दल बोलत आहे.

पुढे अख्तर म्हणाला, “मला त्याला जागतिक मंचावर खेळताना बघायचे आहे कारण तो याच जागेसाठी बनला आहे. सध्या ताशी दीडशे किलोमीटरचा वेग पार करू शकणारे फारसे लोक नाहीत. उमरान सातत्याने या वेगाने गोलंदाजी करत असल्याचे आपण पाहिले आहे. उमरानने 100 मी प्रति तासाचा वेग मनात ठेवला पाहिजे असे मला वाटते. 100 मी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्यांच्या क्लबमध्ये जर तो सामील झाला तर मला खूप आनंद होईल. मात्र यासाठी त्याला दुखापतीपासून दूर राहावे लागेल, अन्यथा त्याची कारकीर्द अर्धवट राहील.”

Leave a comment

Your email address will not be published.